डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेची मंजुरी

बहुउपयोगी एम एच ६० सिहॉक हेलिकॉप्टर श्रेणीतल्या ५ कोटी २८ लाख अमेरीकी डॉलर एवढ्या किंमतीची पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे राज्य सचिव अँथनी ब्लिंकन यांनी याबाबत पुढाकार घेतला. अमेरिकी काँग्रेसच्या परवानगीने संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेनं याबाबतच्या मंजुरी प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे संरक्षण भागीदारी प्रक्रियेतला महत्वपूर्ण सहकारी असलेल्या भारतासोबत द्विपक्षीय धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासह वॉशिंग्टनच्या परराष्ट्र धोरणही मजबूत होणार असल्याचं अमेरिकी प्रशासनानं म्हटलं आहे.