डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

येमेनमध्ये हौथी संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

येमेनची राजधानी साना इथं हौथी या लढाऊ गटाच्या लष्करी तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केले आहेत. हौथीकडून चालवल्या जाणाऱ्या दूरचित्रवाहिनीने ही माहिती दिली. हौथीच्या संरक्षणदलाची इमारत तसंच दारुगोळा उत्पादनांचा कारखाना अशा ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लक्षणीय नुकसान झाल्याचं या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. तीस आणि एकतीस डिसेंबरला केलेले हे हल्ले तांबडा समुद्र आणि एडनच्या आखातातल्या अमेरिकी जहाजांना नुकसान पोचवण्याची हौथी बंडखोरांची क्षमता नष्ट करण्यासाठी असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. हौथीने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ नोव्हेंबरपासून अमेरिकेच्या जहाजांवरचे हल्ले अधिक तीव्र केले होते.