अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम म्हणून ५ हजारापेक्षा जास्त विमान उड्डाणं विलंबाने होत आहेत किंवा रद्द झाली आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी हवाई वाहतूक मंत्रालयाने न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, आणि वॉशिंग्टन डीसी इथून निघणाऱ्या विमान उड्डाणांमधे ४ टक्के कपात केली आहे. शटडाऊन सुरुच राहीला तर पुढच्या आठवड्यात १० टक्के आणि त्यापुढच्या आठवड्यात २० टक्के कपातीची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला नसल्याचं वाहतूक मंत्री सीन डफी यांनी सांगितलं. अमेरिकेत हा आजवरचा सर्वात दीर्घकाळ चाललेला शटडाऊन असून त्यामुळे अन्नपुरवठा कार्यक्रमावरही परिणाम झाला आहे.
Site Admin | November 8, 2025 7:55 PM | Airline | US
अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत!