अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या राष्ट्रीय संरक्षण प्रमाणीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. मुक्त आणि शांततापूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत आणि क्वाड देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी आणि चीनने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या कायद्याचं महत्व आहे. अमेरिकन सरकारच्या युद्ध विभागाचा ‘सामर्थ्याच्या माध्यमातून शांतता’ हा कार्यक्रम राबवून अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षण उद्योग बळकट करण्यासाठी हा कायदा उपयोगी ठरेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
या कायद्यामध्ये भारताला अमेरिकेचा महत्त्वाचा मित्रदेश मानलं गेलं असून अमेरिका आणि भारत यांच्यात २००८ साली झालेल्या अणुकराराचा संयुक्त आढावा घेण्याची तरतूद या कायद्यात आहे.