August 26, 2025 2:21 PM

printer

अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला अतिरिक्त कर उद्यापासून लागू होणार

अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला अतिरिक्त २५ टक्के कर उद्यापासून लागू होणार आहे. याबाबतच्या सूचना आज जारी झाली.

 

भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी भारतावर हा अतिरिक्त कर लादला होता. हा कर अन्याय्य असून भारताच्या हितासाठी शक्य ते सगळं करू, असं प्रत्युत्तर भारतानं दिलं आहे.