भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारतानं आज नाकारला आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही असं भारतानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय हित आणि बाजार याला अनुसरून भारत इंधन खरेदी करत असतो, भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याची माहिती आपल्याकडे नाही, असं सरकारनं म्हटलं आहे.
दरम्यान, भारत आणि रशियाचे संबंध हे काळाच्या कसोटीवर उतरल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल म्हटलं.