डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 3, 2025 3:15 PM | Tax | US

printer

भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ % शुल्क आकारण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.  भारतात अमेरिकी मालावर लावल्या जाणाऱ्या शुल्काचं प्रत्युत्तर म्हणून हे शुल्क आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. इतरही अनेक देशांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर अशा प्रकारचं प्रत्युत्तर शुल्क अमेरिकेनं लावलं आहे.

युरोपिय महासंघाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर वीस टक्के तर ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर दहा टक्के इतकं शुल्क लावण्यात आलं आहे. चीनवर ३४ टक्के, बांगलादेशवर आणि पाकिस्तानवर ३७, श्रीलंकेवर ४४, तर इस्राईलवर १७ टक्के आयात शुल्क लावण्यात आलं आहे.  

अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात अनेक देशांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावर प्रत्युत्तर दिलं जाईल, असं कॅनडाने म्हटलं आहे, तर इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचं वागणं मैत्रीचं नाही अशी टीका ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी म्हटलं आहे, तर ब्रिटननं यावर मौन बाळगलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा