डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 28, 2025 3:18 PM

printer

जागतिक व्यापार संघटनेत वार्षिक निधी योगदान अमेरिकने थांबवलं

जागतिक व्यापार संघटनेत वार्षिक योगदान थांबवण्याचा निर्णय अमेरिकने घेतला आहे. ‘अमेरिका प्रथम’ या धोरणाचा एक भाग म्हणून अमेरिकेने याआधी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर कल्याणकारी आंतरराष्ट्रीय संघटनांमधे योगदान देणं थांबवलं आहे.

 

जागतिक व्यापार संघटनेच्या वार्षिक निधीतला सुमारे ११ टक्के वाटा अमेरिकेकडून मिळतो. त्यासाठी संघटनेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत, योगदानाविषयी अमेरिकेचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नसल्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधीने नमूद केलं. आणि हा निर्णय कधी होईल याबद्द्लही स्पष्ट माहिती दिली नाही.