भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. यासंबंधी कार्मिक मंत्रालयानं आदेश जारी केला.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं जारी केलेल्या आदेशानुसार, पटेल यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. उर्जित पटेल यांनी याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.