केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या वर्षी झालेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. देशभरातून एकंदर १००९ उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. शक्ती दुबे हिनं या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला तर हर्षिता गोयल दुसरी आली आहे. पुण्याच्या अर्चित डोंगरे यानं महाराष्ट्रात प्रथम तर देशात तिसरा क्रमांक पटकावला. पहिल्या ५ यशस्वी उमेदवारांमध्ये ३ महिला आणि २ पुरुष उमेदवार आहेत.
Site Admin | April 23, 2025 10:02 AM | UPSC Result
UPSC चा निकाल जाहीर
