डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 9, 2025 7:24 PM | UPSC

printer

नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ १८ फेब्रुवारीपर्यंत

केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत १९ ते २५ फेब्रुवारी  पर्यंत असणार आहे.

 

यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा,  प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांत घेतली जाते.