राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एनपीएस अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एकात्मिक निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यूपीएस स्वीकारण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल, अशी माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. यासाठी त्यांना सीआरए यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल, किंवा प्रत्यक्ष अर्ज स्थानिक नोडल कार्यालयात जमा करता येईल.
यूपीएस अंतर्गत, योजना बदलण्याची संधी, करात सवलत, राजीनामा आणि सक्तीच्या निवृत्तीचे फायदे असे अनेक लाभ कर्मचाऱ्यांना मिळतात. ते मिळवण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी वेळेवर अर्ज करावा, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.