डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 30, 2025 3:59 PM | UPI Transactions

printer

जाणून घ्या, UPI द्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश

युपीआयद्वारे व्यवहारांबाबातचे नवे दिशानिर्देश येत्या एक ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आता युपीआयद्वारे रक्कम देताना प्राप्तकर्त्याच्या  बँकेचं नावंही वापरकर्त्याला  दिसणार आहे. त्यामुळे योग्य खात्यावर पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल. तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसेल. याशिवाय अनेक नवीन अटी लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे. त्यानुसार प्रलंबित असलेल्या व्यवहारांची माहिती दिवसातून केवळ तीन वेळा पाहता येईल. याशिवाय युपीआय ॲपमधून दिवसाला जास्तीत जास्त ५० वेळा खात्यातली रक्कम तपासता येईल. युपीआयच्या माध्यमातून ऑटो पे चे व्यवहार यापुढे केवळ ठरावीक वेळांमध्येच होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.