देशाच्या डिजिटल पेमेंटचा आधार असलेल्या युपीआय, म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसनं जुलै २०२५ मध्ये १ हजार ९४७ कोटी व्यवहारांसह एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या व्यवहारांची एकूण रक्कम तब्बल २५ लाख १० हजार कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी युपीआय द्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये वर्षाला ३५ टक्के, तर व्यवहार मूल्यात २२ टक्के वाढ दर्शवत असून, डिजिटल पेमेंट परिसंस्थेतलं युपीआय चं वर्चस्व अधोरेखित करत आहे.
Site Admin | August 2, 2025 8:29 PM | UPI
युपीआयचा गेल्या महिन्यात १ हजार ९४७ कोटी व्यवहारांसह नवीन विक्रम
