व्यक्तीकडून व्यापाऱ्याला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा एका दिवसाला दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं आणि प्रमुख क्षेत्रांमधे पेमेंटची सुविधा सुलभ करणं हा यामागचा हेतू आहे. यापूर्वी वापरकर्त्यांना पेमेंट विभागून करावं लागायचं किंवा धनादेश अथवा बँकेद्वारे पैसे हस्तांतिरत करावे लागत असत. नव्या नियमामुळे ही अडचण दूर होणार आहे.
व्यक्तीकडून व्यक्तीला पेमेंट करण्याची मर्यादा मात्र दिवसाला एक लाख रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे.