बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवहार युपीआय द्वारे करता येतील. याची सुरुवातही त्यांनी आज केली.
Site Admin | October 7, 2025 8:07 PM | UPI
संयुक्त खाते धारकांनाही आता मिळणार UPI सुविधा
