डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 12, 2025 9:04 PM | UPI

printer

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला १० लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

एन पी सी आय नं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या युपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या १५ तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या, अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. मात्र, व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा १ लाख रुपये प्रति दिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. इतर क्षेत्रातही युपीआय व्यवहाराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक मर्यादा प्रति व्यवहार २ लाखांवरून ५ लाख रुपये, तर ई-मार्केटप्लेसवरील शासकीय व्यवहार मर्यादा १ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बिल भरणा आता प्रति दिवस ५ लाख रुपयांपर्यंत करता येणार असून, सोने-चांदी दागिने खरेदी आता १ लाख रुपयांऐवजी २ लाख रुपयांपर्यंत करता येणार आहे.