उत्तर प्रदेशात संततधार पावसामुळं अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, १७ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. ४०२ गावातल्या ८४ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून, ३४३ घरांची पडझड झाली आहे. ४ हजार १५ हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य सुरू आहे, अशी माहिती मदत आयुक्त भानु चंद्र गोस्वामी यांनी दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असंही गोस्वामी यांनी सांगितलं.