डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आगामी  विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई – उद्धव ठाकरे

आगामी  विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. 

 

गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याची मागणी त्यांनी केली. एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकजुटीनं आपल्या मागण्या केंद्राकडून पूर्ण करून घेण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं. यावेळी भाजपचे नेते  राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.