डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या चार वर

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चार वर पोहोचली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या २ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.उत्तरप्रदेशमध्ये काल दुपारी दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वे गाडीचे २१ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले होते. लखनौ-गोहाटी मुख्य रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच या मार्गावरच्या गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.