मागील दोन दिवसांत बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं असून, प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना पत्र लिहिलं.
Site Admin | April 7, 2025 9:15 AM | Sandeep Kshirsagar | Unseasonal Rain
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी
