गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे राज्यभरात २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. यासंदर्भात लवकरच पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले. नाशिकमध्ये आयोजित खरीपपूर्व हंगाम बैठकीनंतर काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खरिप हंगामात खतं कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | May 20, 2025 9:11 AM | Maharashtra | Unseasonal Rain
अवकाळी पावसामुळे २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान
