April 7, 2025 10:41 AM | Unseasonal Rain

printer

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकार्यांना दिले असल्याचं, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. नंदुरबार तालुक्यातल्या नुकसानग्रस्त ठाणेपाडा शिवारात कांदाशेतीची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. या पावसामुळे राज्यातले २४ जिल्हे आणि १०३ तालुके बाधित झाले असून, पंचनामे करुन आठ दिवसात नुकसानीची आकडेवारी कळेल, असं ते म्हणाले. मदतीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, तसंच कांदा पिकाबाबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे देखील केंद्राकडून मदत मागण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल, असं कोकाटे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.