पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राजस्थानात अनेक ठिकाणी काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. राज्याच्या बहुतांश भागात पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामानविभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा शून्याखाली घसरला आहे.
लाहौल-स्पीति आणि कुल्लू मधले सुमारे 130 रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. जम्मू काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशान्य भारतात अनेक ठिकाणी गारांच्या पावसाबरोबरच वादळाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पश्चिम भारतात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, छत्तीसगड या भागात तापमानात वाढ होईल.