डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

राज्याच्या  विविध भागात आज वळवाच्या पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या.  भारतीय हवामान विभागानं मुंबई शहरात आज आणि उद्यासाठी  यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

 

नाशिक शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. आज दुपारनंतर  ढगाळ वातावरण झालं आणि पावसाला सुरूवात झाली. अल्पावधीतच मुसळधार पाऊस झाल्याने शहरातले अनेक रस्ते बंद झाले असून मोठी झाडं उन्मळून पडली.

 

पुणे शहर आणि परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा