उन्नाव बलात्कार प्रकरणातला दोषी कुलदीप सेंगर याच्या जन्मठेपेला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेश आज सर्वाेच्च न्यायालयाने रोखून ठेवला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने याबाबतीतल्या इतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यासाठी चार आठवड्यांनी सुनावणी घेण्यात येईल, असंही सांगितलं.
उन्नाव बलात्कार प्रकरणी सेंगर याने शिक्षा कालावधीतले सात वर्षे पाच महिने आधीच तुरुंगात काढले आहेत असं सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.