शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठानं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार दिनांक ६ ते १० जून या कालावधीत विद्यपीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे.
Site Admin | June 7, 2025 3:23 PM | university-of-mumbai
मुंबई विद्यापीठाचं नवीन वेळापत्रक जाहीर
