डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

परदेशी शिक्षणानंतर भारतात उच्च शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

परदेशी शिक्षण घेऊन नंतर पुन्हा भारतात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष मामिदला जगदेश कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की परदेशी शिक्षणसंस्थांमधून घेतलेल्या पदव्या, पदविका आणि इतर पात्रता प्रमाणपत्रांना मान्यता देऊन, भारतातल्या शिक्षणसंस्थांच्या परिप्रेक्ष्यात त्यांचं मानकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित आणि पारदर्शी पद्धत आयोगाने विकसित केली आहे.