युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पार पडलेल्या वेव्ज परिषदेत संगीत आणि कला क्षेत्रातल्या अनेक नवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांची बीजे रोवली गेली होती, त्याचा परिणाम म्हणून आज संगीत क्षेत्रातला जागतिक पातळीवरचा पहिला करार मुंबईत होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये आज मुंबईत धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

 

नव्या पिढीच्या प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या चित्रपट, संगीत, ओटीटी, गेमिंग इत्यादींच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आणि मुंबई हे केंद्र होतंच परंतु सरकारच्या व्यवसायसुलभतेच्या धोरणामुळे इथली आशयनिर्मितीची गुणवत्ता आणि क्षमता वाढली आहे, त्यामुळे कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याची इच्छा असलेल्या जगभरातल्या सर्व निर्मात्यांचं महाराष्ट्रात आणि मुंबईत स्वागत आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

 

यावेळी एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष ॲडम ग्रॅनाइट, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.