काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसा बाबतचे नवे निर्बंध लागू होणार

अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं लादणाऱ्या काही परदेशी अधिकाऱ्यांवर अमेरिका व्हिसा बाबतचे नवे निर्बंध लागू करणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्यावर या परदेशी अधिकाऱ्यांनी त्यांना दंड ठोठावला, तसंच त्यांचा छळ केल्याचं ते यावेळी म्हणाले. हे निर्बंध परदेशी अधिकारी आणि अमेरिकन नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधनं लादण्यात सहभागी असलेल्यांसाठी लागू राहतील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.