January 9, 2026 8:53 PM

printer

चालू वर्षासह आगामी काही वर्षं भारत ही जगातली सर्वात तेजीनं वाढणारी अर्थव्यवस्था-UN

चालू आर्थिक वर्षात सुद्धा भारताचा आर्थिक विकास दर जगात सर्वाधिक   राहण्याची शक्यता 

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागानं वर्तवली आहे. २०२५-२६ मध्ये हा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा या विभागाचा अंदाज आहे. २०२४-२५ मध्ये हा दर ७ पूर्णांक १ दशांश टक्के होता. जगातल्या इतर सर्व देशांच्या तुलनेत हे दर सर्वाधिक आहेत. नागरिकांकडून होत असलेली खरेदी, सरकारकडून होत असलेली गुंतवणूक यामुळं हा विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल असं World Economic Situation and Prospects 2026 या अहवालात या संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. नजिकच्या काळात झालेल्या कर सुधारणा, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात झालेली कपात याचाही फायदा अर्थव्यवस्थेच्या वाढीला मिळू शकतो, असं यात नमूद आहे. आगामी दोन आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६ पूर्णांक ६ दशांश टक्के आणि ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत सुद्धा जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर अधिकच आहे.