संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे नोव्हेंबर महिन्यासाठीचे अध्यक्ष मायकल इमरान कानू, यांच्याबरोबर एका संयुक्त पत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्ष ॲनालेना बारबॉक यांनी दिली. या पदासाठी महिलांचा विचार व्हावा, अशी शिफारस आवर्जून या पत्रात केल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर आमसभा आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना सरचिटणीसपदासाठीच्या उमेदवारांची शिफारस करण्यासाठी निमंत्रण देतील. नवे सरचिटणीस १ जानेवारी २०२७ पासून कार्यभार स्वीकारतील. जागतिक अशांतता आणि अस्थिरता, हवामान बदलाचं गंभीर स्वरूप, मानवी हक्कांची घसरती परिस्थिती या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे पुढचे सरचिटणीस अतिशय महत्त्वाच्या वेळी सूत्रं हातात घेणार आहेत.
Site Admin | November 26, 2025 3:10 PM | United Nations
संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू