May 17, 2025 9:07 AM | United Nations

printer

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात भारताला मानाच स्थान

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालामध्ये, भारताला जगातली सर्वात वेगाने वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान देण्यात आलं आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन दर जीडीपी हा 6.3 टक्के वाढीचा राहील असा अंदाज आहे.

 

जागतिक आर्थिक परिस्थिती आणि सहामाही आढाव्यानुसार भारताचा 6.3 टक्के विकास दर हा जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2026 मध्येही वाढीचा हा वेग कायम राहून तो 6.4 टक्के होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.