डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार – केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची माहिती

देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.