७४व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्याचं वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

वस्त्रोद्योगात गेल्या दशकात लक्षणीय प्रगती झाली असून २०१४मध्ये याचं मूल्य ८ लाख ४० हजार कोटी इतकं होतं, ते आता वाढून १६ लाख कोटी रुपयांपर्यंत गेल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं ७४व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या क्षेत्रातली स्थानिक बाजारपेठही ६ लाख कोटीवरून १३ लाख कोटीवर गेल्याचं, तसंच कोरोनानंतर देशाच्या निर्यातीतही २५ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. डिसेंबर २०२५पर्यंत देशाचा वस्त्रोद्योग २९ हजार कोटी रुपयांवर गेल्याचं सिंह म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.