केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली रशियाच्या उपपंतप्रधानांची भेट

केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथ रशियाचे उपपंतप्रधान एलेक्सी ओवरचुक यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी भारत आणि रशिया दरम्यान मुख्यतः परिवहन,संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि दुर्मिळ धातू या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक आणि सफल झाल्याच अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हंटल आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथ 18 ते 21 जून दरम्यान सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत भाग घेण्यासाठी सध्या अश्विनी वैष्णव रशियाच्या दौऱ्यावर आहेत.