डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी ते बोलत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गाला सोयी देणे याकडे सरकारचा कल आहे, असं सांगत गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी याच उद्देशाने दोन अमृतभारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असं वैष्णव यांनी नमूद केलं. पन्नास अमृतभारत गाड्यांचं उत्पादनही सुरु झालं आहे, अशी माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली.