डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

समग्र आरोग्यसेवा मानकामुळे जागतिक चिकित्सा पर्यटनाच्या नकाशावर भारताला विशेष स्थान मिळालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. मुंबईत आयुष वैद्यकीय पर्यटन परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. जगभरातून लाखो लोग आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी भारतात येतात. शरीरस्वास्थासोबतच मानसिक आणि अध्यात्मिक स्वास्थ्यालाही महत्व देणारी पारंपरिक भारतीय चिकित्सा आणि आयुष पद्धती यांच्या संयोगातून समग्र आरोग्यसेवा मानक तयार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 

या परिषदेचं आयोजन केंद्रीय आयुष मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि राज्यशासनाच्या वतीने  मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात सोफिटेलमध्ये  केलं होतं. या परिषदेत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा राज्याच्या वैद्यकीय, आयुर्वेदिक, आयुष, रुग्णालये, पर्यटन स्थळं,  प्रशिक्षण, कार्यशाळा इत्यादी माहीती देण्यात आली.