आयुष प्रणाली आकर्षणाचं केंद्र बनत असून जनऔषधी केंद्राच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. पुणे जिल्ह्यात लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये दोन दिवसांच्या राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर काल ते बोलत होते. आयुष औषध केंद्र तहसील स्तरावर उघडण्यात येणार आहेत. यामुळे आयुष उपचारपद्धतीची सर्व औषधं एकाच ठिकाणी वाजवी दरात उपलब्ध होतील असंही जाधव यावेळी म्हणाले. आयुष मंत्रालयाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
Site Admin | May 2, 2025 3:33 PM | Union Minister Prataprao Jadhav
आयुष औषध केंद्र तहसील स्तरावर उघडणार- प्रतापराव जाधव
