October 6, 2024 12:56 PM

printer

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आजपासून जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आजपासून जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते हॅमबर्ग इथं दोन दिवसीय शाश्वतता परिषदेत सहभागी होणार आहेत. शाश्वत विकास, ग्रीन हायड्रोजन, कमी खर्चात वित्तपुरवठा आणि  अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत ते जर्मनी आणि युनायटेड किंगडमच्या मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारत-जर्मनी संबंध मजबूत करणे, व्यावसायाच्या संधी निर्माण करणे आणि अक्षय ऊर्जेच्या विस्ताराला गती देणे हे या भेटीचं उद्दिष्ट आहे.