डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण

एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण केलं. राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. तुलसी आणि विहार या तलावांची माहिती घेऊन मुंबईतल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाय करण्याबाबतही गोयल यांनी सविस्तर चर्चा केली.

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन परिसरात आज आकाशवाणीच्या महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक एल. मधु नाग यांनी वृक्षारोपण केलं. या मोहिमेत आकाशवाणीच्या अन्य अधिकाऱ्यांनाही सहभाग घेतला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.