केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत. कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीतून भारत – कतार यांच्या दरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. कतारमध्ये व्यावसायिक, सनदी लेखापाल संघटना,उद्योग परिषद, उद्योग सदस्य आणि भारतीय समुदायाशी गोयल संवाद साधतील.