भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा व्यापार आणि आर्थिक भागिदारी करार १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज केली. यामुळं देशात १० लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल, असं ते म्हणाले.
युरोपियन मुक्त व्यापार संघटनेत आइसलँड, लिंचेस्टाइन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी १० मार्च रोजी या करारावर स्वाक्षरी झाली होती. यानुसार पहिल्या १० वर्षात हे देश ५० अब्ज डॉलरची आणि पुढच्या ५ वर्षात आणखी ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत.