वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला ते आज उपस्थित राहाणार आहेत. पॅरिसमध्ये काल त्यांनी जागतिक स्तरावरील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रीक वाहने आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांसाठी गुंतवणूक योजनांविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने ही भेट झाली. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात गोयल, फ्रान्सचे वित्त आणि उद्योग मंत्री एरिक लोम्बार्ड आणि व्यापार मंत्री लॉरेंट सेंट मार्टिन यांच्यासमवेत द्वीपक्षीय बैठक घेणार आहेत.
Site Admin | June 3, 2025 10:37 AM | Union Minister Piyush Goyal
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर
