केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. युरोपमधल्या भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं, तसंच प्रत्येक परिस्थितीला अनुकूल आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाच्या परस्पर सामायिक दृष्टीकोनानं पुढे वाटचाल करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आपल्या फ्रान्स भेटीत पियुष गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री तसंच व्यापार मंत्र्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय ते तिथल्या काही प्रमुख कंपन्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटणार आहे. गोयल यांच्या या भेटीदरम्यान भारत फ्रान्स बिझनेस व्यापार गोलमेज परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंच या कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे.
Site Admin | June 1, 2025 3:40 PM | Union Minister Piyush Goyal
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल फ्रान्स आणि इटली दौऱ्यासाठी रवाना
