डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. तिथे रेजिओ कॅलाब्रिया इथे होणाऱ्या जी7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होतील. तसंच, सहभागी राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्ये गोयल सहभागी होतील. ही भेट व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधींचं प्रदर्शन करणार्‍या भारताच्या धोरणात्मक प्रयत्नांना अधोरेखित करत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.

 

इटलीला भेट देण्यापूर्वी गोयल आज आणि उद्या स्वित्झर्लंडमध्ये स्विस समपदस्थांसोबत व्यावसायिक तसंच अधिकृत बैठकींसाठी जात आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.