विकसित भारतासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं-नितीन गडकरी

भारत हा जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं २० व्या एफ आय सी सी आय उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं असून भारताला विकसित देश बनवण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल, असं गडकरी म्हणाले. त्यामुळे शिक्षण, संशोधन क्षेत्राला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.