शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करून उत्पन्नवाढ करावी-नितीन गडकरी

शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करून उत्पन्नवाढ करावी, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते  आज बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, तर देशाचं अर्थकारण मजबूत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन आणि मूल्यवृद्धी या दोन्ही दिशांनी पुढे जायला हवं असं ते म्हणाले. साखर कारखाने पूर्ण क्षमतेनं चालावेत यासाठी नागपूर, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस लागवडीला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं.