डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार-नितीन गडकरी

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस लवकरच नागपूरहून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केली. १३५ आसनक्षमतेची ही वातानुकूलित बस लवकरच नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही सेवा रिंग रोड मार्गावर असेल आणि नंतर शहराच्या इतर मार्गांवर तिचा विस्तार होईल असं गडकरी यांनी सांगितलं. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील २ पूर्णांक ८५ शतांश किलोमीटर लांबीच्या, चार मार्गिका असलेल्या ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. या पुलासाठी १९१ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.   

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात आगामी पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली तसेच काटोल इथं राज्यातलं सर्वात मोठं संत्र प्रक्रिया फूड पार्क उभारण्याची घोषणा केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल हेही यावेळी उपस्थित होते.