डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकार ठोस कारवाई करत नसल्याचा केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचा आरोप

आरजी कर रुग्णालयलामधल्या डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकार ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी केला आहे. महिला डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरवण्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या वतीन आरोग्य मंत्रालयानं पाठवलं असल्याचं त्यांनी तामिळनाडूत नागरकोइल इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छिमारांबद्दल बोलताना मुरुगन म्हणाले की, केंद्र सरकार मच्छिमारांच्या सुटकेसाठी पावलं उचलत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.